Indian Oil Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये ४०० पदांसाठी बंपर भरती; दहावी पास उमेदवार करु शकतात अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

Indian Oil Recruitment 2024: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेटिंस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.४०० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेटिंस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. २ ऑगस्टपासून या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १९ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीसाठी ४०० पदे रिक्त आहेत. यामध्ये अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत आयटीआय डिप्लोमा केलेला असणे गरजेचे आहे. टेक्नीशियन अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने ३ वर्षांचे डिप्लोमा संबंधित इंजिनियरिंगमध्ये रेलेला असावा. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने ५० टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.

या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर तुमची प्री इंगेजमेंट मेडिकल फिटनेस टेस्ट होणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या नोकरीबाबत संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT