Indian Oil Job Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Job: परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये ३९४ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ३९४ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी

अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर

३९४ पदांसाठी होणार भरती

शिक्षण पूर्ण झालं असेल अन् नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येणार आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. पाइपलाइन डिवीजनमध्ये ही भरती केली जाणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी

इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अधिसूचना जारी केली आहे. iocl.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही सर्व माहिती मिळवू शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२६ असणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एकूण ३९४ पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी तुम्हाला iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. आसाम, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

इंडियन ऑइलमधील ट्रेक्निशियन अप्रेंटिस ट्रेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनियरिंग ऑटोमोबाइल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेट्रॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT