Indian Navy Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Navy Job: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा करावा?

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात फ्रेशर्ससाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

अनेकांना देशसेवा करण्याची इच्छा असते. यासाठी नौदल, आर्मीमध्ये नोकरीच्या संधीची वाट पाहत असतात. सध्या भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि टेक्निकल विभागात भरती जाहीर केली आहे. (Indian Navy)

B.Tech Entry July 2025 Batch साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. भारतीय नौदलातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

भारतीय नौदलातील ही भरती १०-२ इंटर बीटेक एंट्रीअंतर्गत होणार आहे. म्हणजे १०वी आणि बारावीनंतर बीटेक केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी आणि १२वी परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयात ७० पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. याचसोबत त्यांनी JEEMAIN 2024 परीक्षा पास केलेली असावी. (Indian Navy Recruitment)

इंडियन नेव्हीतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जानेवारी चे १ जुलै २००८ च्या मध्ये झाला असावा. याचसोबत उमेदवाराची उंची १५७ सेमी असावी. उमेदवारांची निवड जेईई मेन या परीक्षेत मिळालेल्या रँकच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरायचे नाही. या नोकरीसाठी तुम्ही भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Indian Navy Job)

बँक ऑफ बडोदा भरती (Bank Of Baroda recruitment)

सध्या बँक ऑफ बडोदामध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कॉन्ट्रॅक्ट पोस्ट्स पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. मॅनेजरसह इतर अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT