Indian Bank Recruitment Google
naukri-job-news

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० शिकाऊ पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत नोकरीची मोठी संधी आहे. बँकेत १५०० अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन बँकेत शिकाऊ पदांसाठी भरती सुरु आहे. १५०० जागांसाठी ही भरती जाहिर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

इंडियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. बँकेने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. १० जुलै २०२४ रोजी याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही www.indian.bank.in या वेबसाइटवर जाऊन याबाबत फॉर्म भरु शकतात.

ज्या तरुणांना बँकेत काम करण्याची इच्छा आहे. भविष्यात त्यांना बँकर बनायचे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.१० जुलै म्हणजेच आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. २० ते २८ वयोगटातील लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

इंडियन बँकेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.indian.bank.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर करिअर पेजवर क्लिक करा. तिथे तुम्ही भरतीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यातील इंडियन बँक अपरेंटिस भरती २०२४ वर क्लिक करा. त्यानंतर एक लिंक ओपन होईल. या लिंकवर जाऊन तुम्हाला आवश्यक माहिती भरावी. यानंतर त्या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

ही भरती संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शाखेसाठी केली जाणार आहे. यात महाराष्ट्रातदेखील अनेक शाखांसाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीचा अर्ज दाखल करताना सामान्य,EWS,OBC प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत? भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं राजकारण सांगितलं

Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार

ओबीसी मागण्यांवर बबनराव तायवाडे आणि परिणय फुके यांची तीव्र भूमिका|VIDEO

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

SCROLL FOR NEXT