IIBF Recruitment Saam Tv
naukri-job-news

IIBF Recruitment : महिना ९१३०० रुपये पगार, IIBF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

IIBF Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयबीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी ९१००० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ऑफ फायनान्स मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ऑफ फायनान्समध्ये कनिष्ठ कार्यकारी पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

आयआयएफबीमध्ये ११ जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आयआयएफबीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे. (IIBF Job)

ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून कॉमर्स/इकोनॉमिक्स / बिझनेस मॅनेजमेंट / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्ष असावे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग ऑफ फायनान्स कनिष्ठ कार्यकारी पदासाठी उमेदवारांना २८,३०० ते ९१,३०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे. तुम्ही iibf.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (IIBF Recruitment)

मुंबई महानगरपालिकेत नोकरी

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. वॉर्ड इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठीही उमेदवारांना ९२००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT