IDBI Bank Job Saam Tv
naukri-job-news

IDBI Bank Job: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी; मिळणार १,५७,००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

IDBI Bank SO Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. या नोकरीबाबत सर्व माहिती idbibank.in वर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे.

आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी पदासांठी २५ जागा रिक्त आहेत. मॅनेजर ग्रेड बी ऑफिसर पदासाठी ३१ पदे रिक्त आहे. एकूण ५६ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

असिस्टंट मॅनेजर ग्रेड सी या पदासाठी ग्रॅज्युएट, एमबीए पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी ७ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.२८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. मॅनेजर ग्रेड बी पदासाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.

असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. मेट्रो शहरांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,५७,००० रुपये पगार मिळणार आहे. तर ग्रेड बी मॅनेजर पदासाठी १,१९,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT