IBPS PO Recruitment Saam Tv
naukri-job-news

IBPS PO Recruitment: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; IBPS PO द्वारे ४४५५ पदे भरती केली जाणार; मिळणार ५० हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन

IBPS PO Recruitment 2024: तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयबीपीएस द्वारे प्रोबेशनरी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ४४५५ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. आयबीपीएसद्वारे दरवर्षी ऑफिसर पदासाठी भरती केली जाते. IBPS ने यावर्षी ४४५५ प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुक पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

IBPS PO पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात १ ऑगस्ट म्हणजेच आजपासून झाली आहे. यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रेनी (CRP PO/MT) या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. तर अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीक ५ सप्टेंबर २०२४ आहे. तुम्ही या भरतीसाठी फी १ ते २१ ऑगस्टपर्यंत भरु शकतात.

आयबीपीएस पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी लेखी परीक्षा घेतली जाते. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जी वर्षातून एकदाच घेतली जाते. दरवर्षी ४ ते ५ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात.

या परीक्षेसाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PH श्रेणीतील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाछी प्रीलियम आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा घेतल्या जातात. हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

IBPS PO प्रिलियम परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होईल. मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होईल. या परीक्षेचा निकाल डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात लागेल. या नोकरीसाठी निवड झाल्यास तुम्हाला ३६,००० मूळ वेतन देण्यात येईल. त्यात भत्ते आणि खर्चाचा समावेश करुन ५२ हजार रुपये मासिक वेतन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

SCROLL FOR NEXT