Homeguard Bharti Saam Tv
naukri-job-news

Homeguard Job: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; होमगार्डसाठी २७७१ जागा रिक्त; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Homeguard Recruitment: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. होमगार्ड पदासाठी २७७१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबईमधील २७७१ होमगार्डच्या जागा भरण्यात येणार आहे. महिला व पुरुष पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. होमगार्ड पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे. (Homeguard Recruitment)

होमगार्ड पदाबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. होमगार्डमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक तरुणांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या वेबसाइटवर जाऊन माहिती वाचावी. (Homeguard Recruitment 2024)

पोलिस दलातील अपुऱ्या संख्येमुळे पोलिसांवर कामाचा ताण येत होता. त्यामुळे बंदोबस्ताचा भार होमगार्डवर सोपवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा होमगार्ड पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २७७१ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. १० जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.

होमगार्ड पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची १६२ सेमी असावी. तर महिलांची उंची १५० सेमी असणे गरजेचे आहे.

होमगार्ड नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला रहिवासी पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्मतारीख, १०वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असते. तुम्हाला हे कागदपत्रं अपलोड करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT