ESIC Recruitment Saam tv
naukri-job-news

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ESIC Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

ईएसआयसी फरीदाबादने मेडिकल विभागात स्पेशलिस्ट, सिनियर रेजिडेंट, सुपर स्पेशलिस्ट, टिचिंग फॅकल्टी, विजिटिंग फॅकल्टी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (ESIC Recruitment)

ईएसआयसीमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे. २०० रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्पेशलिस्ट पदासाठी ४ जागा रिक्त आहे. पॅनलमेंट, सुपर स्पेशलिस्ट पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. टिचिंग फॅकल्टीमध्ये ९ जागा रिक्त आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी २१ जागा रिक्त आहे. सहायक प्रोफेसर पदासाठी ३१ जागा रिक्त आहेत. सिनियर रेजिडेंट पदासाठी १२१ रिक्त जागा आहेत.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, एज्युकेशल सर्टिफिकेट, अनुभवाचे सर्टिफिकेट हे कागदपत्र असणे गरजेचे आहे. (ESIC Recruitment 2025)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची योग्यता आणि मेडिकल फिल्डमधील अनुभव याद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग केले जाते. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT