NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; NHAI मध्ये भरती; पगार १,५०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

NHAI Recruitment 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. कंसल्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

एनएचएआयमधील नोकरीसाठी nhai.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या भरती मोहिमेत प्रिंसिपल कंसल्टंट, कंसल्टंट (RAMS),कंसल्टंट (RAMS-IT) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (NHAI Recruitment 2025)

एनएचएआयमधील या भरती मोहिमेत तुम्ही ५ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.प्रिंसिपल कंसल्टंट (RAMS) साठी वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कंसल्टंट पदासाठी ५० वर्षे वयोमर्यादा आहे. कंसल्टंट (RAMS-IT)साठी 50 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (NHAI Recruitment)

प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीमध्ये ग्रॅज्युएशन केलेले असावे.प्रिंसिपल कंसल्टंट पदासाठी २,३०,००० रुपये पगार मिळणार आहे. कंसल्टंट पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. तर कंसल्टेंट (RAMS-IT)पदासाठी १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ५ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे.याबाबत अधिक माहितीसाठी वेबसाइटवर भेट द्या. चांगल्या पगाराची नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: १३ वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता माळीला ओळखणंही कठीण; 'जुळून येती रेशीमगाठी'मधील फोटो व्हायरल

शिक्षकांना जनगणना ड्युटीला नकार देता येणार नाही: हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra Politics: कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नितेश राणेंनी बडा नेता फोडला

Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र; पाहा 5 लेटेस्ट डिझाईन्स!

SCROLL FOR NEXT