MHA Recruitment Saam Tv
naukri-job-news

MHA Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; गृह मंत्रालयात भरती; पगार ११८५०० रुपये; अर्ज कसा करावा?

MHA Recruitment 2025: गृह मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.गृह मंत्रालयात सिनियर कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गृह मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गृह मंत्रालयात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत गृह मंत्रालयाच्या mha.gov.in वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

गृह मंत्रालयातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. गृह मंत्रालयात सिनियर कंसल्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी अर्ज करायचा विचार करत असाल तर सर्वप्रथम वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचावी.

सिनियर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती सेवानिवृ्त्त सरकारी कर्मचारी असावा. डेप्युटी सेक्रेटरी आणि डायरेक्टर म्हणून काम केलेले असावे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुमच्याकडे एमबीए पदवी असावी. तसेच १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ७८००० ते ११८५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे.

तुम्हाला अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर दिसेल. हा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे.याचसोबत तुम्ही admn.del-cepi@govcontractor.in या मेलवरदेखील अर्ज पाठवू शकतात.

गृह मंत्रालयात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. कोणत्याही परीक्षेशिवाय चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT