Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना ८१,००० रुपये पगार; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Wildlife Crime Control Breau Recruitment: तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये काम करायची संधी आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये हेड कॉन्स्टेबर, ड्रायव्हर, पब्लिक प्रॉसिक्युटर, असिस्टंट ड्रायव्हर, इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर आणि डिवीजन क्लर्क पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Government Job)

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमधील या नोकरीसाठी wccb.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. पब्लिक प्रॉसिक्युटर पदासाठी १ जागा रिक्त आहे. असिस्टंट डायरेक्टर पदासाठी १ पज, इन्स्पेक्टर पदासाठी २ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड पदासाठी ४ जागा रिक्त आहेत. डिवीजन क्लर्क पदासाठी १ तर हेड कॉन्स्टेबल पदासाठी १ जागा रिक्त आहे.

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Wildlife Crime Control Breau Recruitment)

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती दिल्ली, रामनाथपुरम,भोपाळ, कोची, कोलकाता येथे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५६०० ते ८१,१०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परिक्षेशिवाय केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज झालेल्या उमेदवारांची ३ वर्षांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Maharashtra News Live: पंढरपुरात चंद्रभागेला पूर; ७० कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT