Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारत सरकारच्या 'या' कंपनीत सुरु आहे भरती; असा करा अर्ज

WCL Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या भारत सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्ड्स या कंपनीत भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारत सरकारच्या कोल माइनिंग कंपनीने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारच्या या कंपनीत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या कोल मायनिंग वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधील या भरतीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.www.westerncoal.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कंपनी भारत सरकारच्याअंतर्गत काम करते. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी एकूण १०१ जागा रिक्त आहेत. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी २१५ जागा रिक्त आहेत. एकूण ३१६ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मायनिंग इंजिनियरिंगमध्ये बीई/बीटेक/AIMEपास केलेली असावी. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी मायनिंग इंजिनियर/ मायलिंग सर्वेइंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Government Job)

वेस्टर्न कोल्डफील्ड्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची १८ वर्ष असावी. या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांना ९००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसिसवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर फॉर्म भरावा लागेल. (WCL Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Death: अजित पवारांना मुखाग्नि दिल्यानंतर डोळ्यात अश्रू, दोन्ही मुलांनी हात जोडून मानले सर्वांचे आभार ; VIDEO

Ajit Pawar Funeral: 'अजित'पर्व संपलं! बंदुकींच्या फैरी झाडून दादांना मानवंदना | VIDEO

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Winter Eye Care : डोळ्यांखालील सूज आणि डार्क सर्कल कमी करण्यासाठी घरगुती आय मास्क

SCROLL FOR NEXT