Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: ठाणे महानगरपालिकेत नोकरी अन् ६०,००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या

Thane Municipal Corporation Recruitment: ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियनाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.ठाणे महानगरपालिकेत सध्या भरती सुरु आहे. महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत भरती जाहीर करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत १२वी, डिप्लोमा पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत माहिती ठाणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत विविध पदे भरली जाणार आहे.वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांसाठी भरती केली जाणार आहे. (Thane Mahanagarpalika Recruitment)

या नोकरीसाठी १८ ते ६९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ही भरती ११ महिने २९ दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. प्रयोगशाळी तंत्रज्ञ पदासाठी १२वी आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल नोंदणीसह डिप्लोमा केला जाणार आहे.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदासाठी एमबीबीएस किंवा मेडिकलमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी तुम्हाला १७००० ते ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. (Thane Municipal Corporation Recruitment)

ठाणे महानगरपालिकेत ४२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.याबाबत माहिती तुम्ही https://www.thanecity.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ठाणे महानगरपालिका भवन, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे पश्चिम येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रेदेखील अर्जासोबत पाठवायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT