Government Job In ED Office Saam TV
naukri-job-news

Government Job in ED: ईडीची सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी 42 पदांसाठी भरती; तब्बल ७५००० मिळणार पगार, आजच अर्ज करा

Government Job In Enforcement Directorate Office: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ईडीमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. तुम्हीही या नोकरीसाठा अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ईडीसारख्या मोठ्या विभागात इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकराच लवकर अर्ज करावेत. रोजच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

सध्या सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यालाच आळा घालण्यासाठी ईडीने ४२ कॉम्प्युटर इंजिनियर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. यात सात सिस्टीम अॅनालिस्ट तर ३६ तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ईडीच्या संगणक प्रणालीसोबत काम करता येणार आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यव्हार, सायबर सिक्युरिटी सॉफ्वेअर, ई-मेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी तब्बल ७० हजार रुपये वेतन तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना ५५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

ही पदभरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंतदेखील वाढवण्यात येऊ शकते. ईडीतील काम हे संवेदनशील असल्याने उमेदवारांना गुप्तता करारावर सही करावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT