PGCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ऑफिसर ट्रेनी पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा कराल?

PGCIL Recruitment: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑफिसर ट्रेनी पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पीजीसीआयएलमध्ये ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२४ आहे. (PGCIL Recruitment)

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला वेबसाइटवर डायरेक्ट लिंक मिळेल. त्यावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरा अन् अर्ज सबमिट करा.

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे यूजीसी नीट दिसेंबर २०२४ चे स्कोअरकार्ड असायला हवे. त्याचसोबत उमेदवारांकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री/ डिप्लोमा / मास कम्युनिकेशम डिग्री/ एमबीए इन एचआर पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्ष असायला हवी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. (PGCIL Recruitment 2024)

अर्ज कसा करावा? (Application process for Job)

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.powergrid.in या साइटवर जावे लागेल.

त्यानंतर होम पेजवर करिअर बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर ऑफिसर ट्रेनी रिक्रूटमेंट दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

अर्जाचे शुल्क भरुन तुम्ही अर्ज सबमिट करा.

या भरती मोहिमेत ७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिसर ट्रेन पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. सोशल मॅनेजमेंटसाठी १५ पदे रिक्त आहेत. एचआर पॉवरग्रिड पदासाठी ३५ जागा, पीआरसाठी ७ जागा रिक्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Lek Ladki Yojana: राज्य सरकारची योजना! लेक १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १ लाख १ हजार रुपये

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT