Post Office Bharti Saam Tv
naukri-job-news

Post Office Bharti: खुशखबर! दहावी पास उमेदवारांसाठी ६३००० पगाराची नोकरी; पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू

Post Office Bharti 2024: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी नोकरीमध्ये पोस्ट ऑफिस नोकरीचा समावेश होतो. भारती पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. भारतीय पोस्ट विभागात सामान्य श्रेणीतील रिक्त पदांसाठी भरती आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. भारत सरकार, संचार मंत्रालय आणि पोस्ट ऑफिसद्वारे या नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भारतीय डाक विभाग आणि प्रशासन विभागाद्वारे ही जाहिरात देण्यात आली आहे. केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जात आहे. १० वी पास उमेदवारांसाठी या भरतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे दहावी पास तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. 'स्टाफ कार ड्रायव्हर' या पदासाठी ही नोकरी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. किमान ३ वर्ष कार चालवण्याचा अनुभव असायला हवा.

२ रिक्त पदांसाठी नोकरी उपलब्ध आहे. नवी दिल्ली येथे ही नोकरी करावी लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, अनुभव, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स ऑफलाइन पद्धतीने पाठवावेत. श्री विनायक मिश्रा, सहाय्यक महासंचालक, पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर ही माहिती पाठवावी. २३ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT