Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: इंजिनियर झालात? भारत सरकारच्या या कंपनीत सुरु आहे भरती; मिळणार १२०००० पगार; अर्ज कसा करायचा?

PGCIL Recruitment 2024: भारत सरकारच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंजिनियर डिग्री प्राप्त उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.जर तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ४७ पदांसाठी ही भरती सुरु आहे.

इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स पदासाठी ही भरती केली जाणार आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ही भरती होणार आहे.पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधील भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल) पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी २१ पदे ही सामान्य प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर इतर पदे राखीव प्रवर्गासाठी आहेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल बीई/ बीटेक/बीएससी इंजिनियरिंगमधील डिग्री प्राप्त केली असावी. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी २८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३० हजार ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळणार आहे.

PGCIL मध्ये या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंजिनिंयरिंग केलेल्या तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT