Anganwadi Bharti Saam Tv
naukri-job-news

Anganwadi Bharti: अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; २५ पदांसाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकात्मित बालविकास सेना योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची संधी आहे.

महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.राज्य सरकार अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. १२ वी पास महिला उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.

१८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी एकूण २५ जागा रिक्त आहेत. अंगनवाडीत पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. अमरावती उत्तर या विभागासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी अमरावती उत्तर विभागातील स्थानिक रहिवासी अर्ज करु शकतात. उमेदवाराने मराठी विषयासह १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे दहावीच्या बोर्डचे प्रमाणपत्र असावे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज बाल विकास प्रकल्प कार्यालय (सिव्हिल) अमरावती उत्तर, अधिवक्ता विकास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड, परतवाडा, ता. अचलपूर, जिल्हा-अमरावती येथे पाठवायचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT