NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: NTPC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी;मॅनेजर पदासाठी सुरु आहे भरती; मिळणार २००००० रुपये पगार;जाणून घ्या सविस्तर

NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. २५० हून अधिक जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नॅशनल थर्ल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची उत्तम संधी आहे.ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. डेप्युटी मॅनेजरसह अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२२४ आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी १८ सप्टेंबरपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १४ सप्टेंबर २०२४पासून अर्जप्रकिया सुरु होणार आहे.

डेप्युटी मॅनेजर पदासाठी B.E/B.Tech डिग्री प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल इरेशन, डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल इरेशन, डेप्युटी मॅनेजर सिव्हिल इरेशन अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी कामाचा अनुभव असलेल्या लोकांना प्राधान्य दिला जाईल. काही पदांसाठी ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे तर काही पदांसाठी १० वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे.

या नोकरीसाठी तुम्ही https://ntpc.co.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७०,००० ते २,००,००० रुपये वेतन मिळणार आहे.

याचसोबत सध्या रेल्वेमध्येदेखील विविध पदांसाठी भरती सुरु आहे. उत्तर रेल्वेत तब्बल १८००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठीही उमेदवार अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT