Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: इंजिनियर झालात?भारत सरकारच्या या कंपनीत भरती सुरु, अर्ज कुठे अन् कसा करावा?

NLC Recruitment 2024: इंजिनियर झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनएलसी कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी एनएलसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अरज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (NLC Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (NLC Recruitment 2024)

या भरती मोहिमेत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी १६७ रिक्त जागा आहेत. यातील मेकॅनिकल पदासाठी ८४ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी ४८ जागा तर सिविल इंजिनियर पदासाठी २५ जागा रिक्त आहे. तर कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन पदासाठी १० जागा रिक्त आहेत.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांनी nlcindia.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

वेबसाइटवर जाऊन करिअर टॅबवर क्लिक करायचे आहे.

यानंतर ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनीमध्ये क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५४ रुपये अर्ज भरायचा आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५४ रुपये अर्ज फी भरायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT