NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Recruitment 2024: NHAI मध्ये विविध पदांसाठी भरती; मिळणार ६ लाख रुपये पगार;अशा पद्धतीने करा अर्ज

NHAI Recruitment 2024 Application Process: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.NHAI ने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. १८ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NHAI भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांचा कालावधी २ वर्षांसाठी आहे. हा कालावधी उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. NHAI भरतीमध्ये उमेदवारांची निवड समितीद्वारे केली जाईल. या भरतीमध्ये DPR तज्ञ, वरिष्ठ महामार्ग तज्ञ, रस्ता सुरक्षा तज्ञ, पर्यावरण/वन तज्ञ, भूतंत्र तज्ञ, या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

NHAI भरतीमध्ये अर्ज

करणाऱ्या व्यक्तीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वयोगटासाठी वयाची अट वेगळी आहे. त्यांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

प्रिन्सिपल डीपीआर तज्ञ या पदासाठी उमेदवारांना ६ लाख रुपयांचे मासिक वेतन दिले जाईल. तर वरिष्ठ महामार्ग तज्ञ या पदासाठी ५.५० लाखांपर्यंत वेतन दिले जाईल. रस्ता सुरक्षा तज्ञ, वाहतूक तज्ञ यांना ४.५० लाख रुपये मासिक पगार मिळणार आहे. तर इतर पदांसाठी २.३० लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग NHAI मुख्यालय, नवी दिलेली येथे करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT