Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती; पगार १,६३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी भरघोस पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सिनियर रेसिडेंट पदासाठी भरती सुरु आहे. २२ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. ऑर्थोपेडिक्स, मेडिसिन, सर्जरी, रेडिओलॉजी अशा विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज करावेत. (Government Job)

सिनियर रेसिडेंट पदासाठी ३ वर्षांसाठी भरती केली जाणार आहे.ज्या उमेदवारांनी याआधी सरकारी नोकरी केली आहे ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त करुन दोन वर्षांचा अनुभव असावा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावी.

या नोकरीसाठी उमेदवारांना बेसिक सॅलरी ६७,७०० रुपये असणार आहे. ज्युनिअर स्पेशलिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे तर सिनियर स्पेशलिस्ट पदासाठी १,६३,००० रुपये पगार मिळणार आहे. (ESIC Recruitment 2024)

या नोकरीसाठी उमेदवारांना वॉक इन इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी उपस्थित राहायचे आहे. (ESIC Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Skin Care: हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी 'या' सोप्या टिप्स वापरा; चेहरा होईल एकदम सॉफ्ट

OTT Platform: दू'सिकंदर का मुकद्दर' ते 'द मॅडनेसपर्यंत, 'या' वेब सीरिज होणार या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित

Manjula Gavit: 'विकासाचीगंगा घरोघरी पोहचवणार' मंजुळा गावित यांनी दिली प्रतिक्रिया

'Bigg Boss 18' मध्ये नवीन ट्विस्ट; मित्रच होणार शत्रू, सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

IPL Mega Auction 2025 : आज आयपीएलच्या मेगा लिलावाचा दुसरा दिवस; कोणत्या टीमकडे किती जागा रिक्त?

SCROLL FOR NEXT