CIDCO Job Saam Tv
naukri-job-news

CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र म्हणजे सिडको येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सिडकोअंतर्गत घरे बांधली जातात. महाराष्ट्र शासनाचा हा उप्क्रम आहे. नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सिडको ही खूप मोठी संस्था आहे. सिडकोमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सिडकोमध्ये सध्या वर्ग १ आणि वर्ग २ मधील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहयोगी नियोजनकार या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६७,७०० रुपये ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. (CIDCO Recruitmemt 2024)

उपनियोजनकार पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सिडकोमध्ये कनिष्ठ नियोजनकार पदासाठीही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १४ रिक्त जागा आहेत. वर्ग २ गटासाठी ही भरती करण्यात येणार आहे. क्षेत्राधिकारी पदासाठीही रिक्त जागा आहे. ९ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.

या भरतीबाबत सविस्तर जाहिरात www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. तेथील करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या नोकरीबाबत सविस्तर माहिती वाचू शकतात. (CIDCO Job)

अमरावतीत नोकरीची संधी

सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत अमरावती येथेदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. १३० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. डेन्टल सर्जन, फायनान्स ऑफिसर ते फिजियोथेरेपी अशा अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

Pune Crime : बिबेवाडीला जाण्यासाठी स्वारगेटवरून रिक्षा पकडली अन् घडला भयंकर प्रकार; पुण्यातील घटनेने खळबळ

Live Video : रतन टाटांची अंतयात्रा | Marathi News

PAK vs ENG: पाकिस्तानमध्ये इंग्लंडने तोडला भारताचा २० वर्ष जुना विक्रम, काय होता रेकॉर्ड?

Maharashtra News Live Updates: राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या

SCROLL FOR NEXT