Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; महिना पगार १८००००; या पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सर्वकाही

Central Wearhousing Corporation Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनममध्ये भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मॅनेजमेंट ट्रेनी, अकाउंटंट, सुपरिटेंडंट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरत विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. एचआर, मार्केटिंग, फायनान्स या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. (Central Wearhousing Corporation Recruitment)

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती cewacor.nic.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Government Job)

सेंट्रल वेयरहाउसिंग कॉर्पोरेशनमधील या भरती मोहिमेत एकूण १७९ पदे भरती केली जाणार आहेत.यात मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ४० जागा रिक्त आहे. टेक्निकल मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १३ पदे रिक्ट आहेत. अकाउंटंट पदासाठी ९ पदे रिक्त आहेत. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ८१ जागा रिक्त आहेत. ही पदभरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सूचना पाहावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांकडे सप्लाय अँड मॅनेजमेंटमध्ये एमबीए, मास्टर्स पदवी, बॅचलर ऑफ कॉमर्स, सीए, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २८ असावी. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी २९००० ते १८०००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT