Government Job Saam TV
naukri-job-news

Government Job:परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; १०वी पास उमेदवारांना मोठी संधी, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

Government Job : तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल कोलफिल्ड्समध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. १०वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सीसीएल म्हणजे सेंट्रल कोल्डफील्ड्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. अप्रेटिंस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

सेंट्रल कोलफिल्ड्समध्ये ११८० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. centrlcoalfields.in या वेबसाइटवर नोकरीबाबत सर्व अपडेट देण्यात आले आहेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

या भरती मोहिमेत ४८४ पदभरती केली जाणार आहे. यामध्ये फ्रेशर आणि ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेटिंससाठी काही पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसिसवर उमेदवारांची निवड केली जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या साइटवर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही सध्या भरती सुरु आहे. एसबीआयमध्ये ११००पेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. कॅडर ऑफिसर पदासाठी रिक्त जागा आहेत.तुम्ही या नोकरीसाठीदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT