UIDAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

UIDAI Recruitment: महिना २ लाख पगार, Aadhaar मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

UIDAI Recruitment 2024: आधार कार्ड बनवणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २ लाख पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभाग म्हणजेच UIDAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.UIDAI ही संस्था देशातील लोकांचे आधार कार्ड बनवणे आणि ते रेगुलेट करण्याचे काम करते.

यूआयडीएआयमध्ये हैदराबाद येथील क्षेत्रीय कार्यालयासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. डेप्युटी डायरेक्टर आणि सिनियर अकाउंट ऑफिसर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. (Government Job)

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२४ आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्याद ५६ वर्ष असायला हवी.चार्टड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए (फायनान्स) या क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

डेप्युटी डायरेक्टर या पदासाठी उमेदवारांना मासिक वेतन ६७,७०० ते २,०८,७०० रुपये मिळणार आहे. सिनियर अकाउंट ऑफिसर पदासाठी ५६,१०० ते १,७७,०० रुपये वेतन मिळणार आहे. (UIDAI Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाचा फॉर्म डाउनलोड करुन घ्यावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय), क्षेत्रीय कार्यालय, ६ वा मजला, ईस्ट ब्लॉक, स्वर्ण जयंती कॉम्प्लेक्स, मातृवनमच्या जवळ, हैदराबाद ५०००३८ इथे पाठवायचा आहे. (Aadhaar Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT