Bank Of Baroda Saam Tv
naukri-job-news

Bank Of Baroda : परीक्षा नाही, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पगार ते अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bank Of Baroda Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या सुपरवायजर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बीसी सुपरवाइजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्ष असावे. जर तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी असाल तर तुम्हाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६५ वर्ष असावी.

बीसी सुपरवायजर पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. उमेदवारांच्या परफॉर्मन्सच्या आधारे निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती bankofbaroda.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज द रिजनल मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, सबरकांता रिजनल ऑफिस, दुसरा मजला परफेक्त अॅव्हेन्यु, शमलाजी हायवे रोड, हिम्मतनगर-३८३००१ येथे अर्ज पाठवायचा आहे.

EXIM बँकेत भरती

बँकेत नोकरी करायची असेल तर सध्या EXIM बँकेतदेखील भरती सुरु आहे.EXIM बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. एक्झिम बँकेत ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT