Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार २ लाख रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Government Job: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. या नोकरीसाठी तरुणांना २ लाख रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत सरकारने मुरगाव बंद प्राधिकरण गोवा येथे भरती जाहीर केली आहे. मुरगाव बंद प्राधिकरण गोवा येथे १३ पदांसाठी रिक्त जागा आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सर्व माहिती mptgoa.gov.in वर दिलेली आहे.

मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा हे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. गोव्याच्या या बंदरावर विविध पदांसाठी भरती केली जात आहे.यामध्ये अभियंता,मरीन आणि फायनान्स या क्षेत्रातील उमेदवार अर्ज करु शकतात. डेप्युटी सेक्रेटरी, अकाउंट ऑफिसर, असिस्टंट एग्जीक्यूटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, असिस्टंट मटेरियल मॅनेजर, ट्रेनी पायलट, लॉ ऑफिसर, असिस्टंट कॉस्ट अकाउंट ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर(इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. सीए/ मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग/कायदा या क्षेत्रातील पदवी असावी. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४० हजार ते २ लाखापर्यंत मासिक मानधन मिळते.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर नॅशनल बँकेतदेखील भरती सुरु आहे. आयबीपीएसद्वारे नॅशनल बँकेत भरती केली जाणार आहे. यामध्ये लिपिक पदे, स्पेशलिस्ट ऑफिसर आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. ही भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतरच मुलाखतीला बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस आणि तेल टंचाईवर लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि LPGची टंचाई होणार दूर; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

विधानसभेत 'न भूतो न भविष्यति' बदल होणार, ४९ वर्षांनंतर आमदारांची संख्या वाढणार? काय परिणाम होईल? जाणून घ्या…

Kale Mani Mangalsutra Designs: काळे मणी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, मराठमोळा लूक येईल खुलून

IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर रंगला जुगाराचा डाव; अचानक टाकली धाड, कारवाईत ३ पोलीस कर्मचारी सापडले

SCROLL FOR NEXT