ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Recruitment: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; ESIC मध्ये भरती निघाली; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

ESIC Recruitment 2025: ESIC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सुपर स्पेशलिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सध्या भरती सुरु आहे. ESIC मध्ये स्पेशलिस्ट पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

ईएसआयसी भरती २०२५ मध्ये पार्ट टाइम सुपर स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ६ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात. (ESIC Recruitment)

ईएसआयसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ६५ वर्ष असावी. या नोकरीबाबत माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. सुपर स्पेशलिस्ट एंट्री लेव्हल पदासाठी आठवड्यातून ४ दिवस काम करायचे आहे. दिवसाला ४ तास काम करायचे आहे.कंलस्टंट पदासाठी १५००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत जर आप्तकालीन परिस्थितीत विजिट करावी लागली तर २०,००० रुपये प्रत्येक महिन्याला पैसे दिले जाणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे घेऊन जायची आहेत. ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालय, १४३ स्टर्लिंग रोड, नुंगमबक्कम, चेन्नई ३४ येथे उपस्थित राहायचे आहे. ६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहेत.

NHAI भरती

सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला प्रिंसिपल कंसल्टंट, कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला nhai.gov.in या वेबसाइटवरजाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT