ESIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ESIC Jobs : रेझ्युम आताच तयार करा, परीक्षाशिवाय सरकारी नोकरी, महिना ६७००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये प्रोफेसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. कर्मचारी राज्य विमा निगमअंतर्गत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सुपर स्पेशलिस्ट, सिनियर रेजिडेंट आणि अॅडजंक्ट फॅकल्टीमध्ये स्पेशलिस्ट फॅकल्टी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण १०४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. कर्मचारी राज्य विमा निगम भरतीमध्ये नोकरीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्ष आहे. सुपर स्पेशलिस्ट पदासाठी वयोमर्यादा ६७ वर्ष आहे. सिनियर रेजिडेंट पदासाठी वयोमर्यादा ४५ वर्ष असणार आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वॉक इन इंटरव्हयूच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीला जाताना उमेदवारांना अर्ज सोबत घेऊन जायचा आहे.

ईएसआयसीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना ६७७०० रुपये वेतन मिळणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्हयू उद्या म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या मुलाखतीसाठी तुम्हाला ईएसआयसी, एमसीएच, देसूला, एमआयए, अलवर राजस्थान येथे उपस्थित राहायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT