EIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

EIL Recruitment 2024: इंजिनियर इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. यामघ्ये डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. (Engineers India Limited Recruitment)

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. B.E/B.Tech/M.Tech/M.E पदवी प्राप्त असावे. तसेच रॉक इंजिनियरिंग, जियोलॉजी, हायड्रोजियोलॉजी आणि मायनिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी डेप्युटी मॅनेजर पदासाठी ७०,००० ते २००००० रुपये पगार मिळणार आहे. मॅनेजर पदासाठी ८०,००० ते २२०००० रुपये पगार मिळणार आहे. (Government job)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर स्कील टेस्ट केली जाणार आहे. यानंतर शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला मेलवर कळवले जाईल. यानंतर पुन्हा या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा.

  • या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम https://www.engineersindia.com या वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या सूचना वाचा. यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • यानंतर स्वतः चा फोटो अपलोड करावा लागेल. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT