ED Recruitment Saam Tv
naukri-job-news

ED Recruitment: सरकारी नोकरी अन् ७०००० रुपये पगार; ईडीमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

ED Recruitment 2025: ईडीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईडीमध्ये सध्या विविध पदांसठी भरती सुरु आहे. टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईडीमध्ये नोकरीसाठी भरती सुरु आहे. एनफोर्समेंट डायरेक्टरेटमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. एनफोर्समेंट डायरेक्टरेटच्या अधिकृत वेबसाइटवर enforcementdirectorate.gov.in जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (ED Recruitment)

ईडीमध्ये ७ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. सिस्टीम अॅनालिस्टसाठी १ जागा रिक्त आहे. सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. एकूण ७ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (ED Recruitment 2025)

सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी ७०,००० रुपये पगार मिळणार आहे. सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट ५५,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरुन ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जावर तुम्हाला सिस्टीम अॅनालिस्ट किंवा सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट असं लिहायचं आहे. तुम्ही अर्ज उप निदेशक (प्रशासन), अतिरिक्त निदेशक कार्यालय, कोलकत्ता झोनल ऑफिसर १, सीजीओ कॉम्प्लेक्स, एमएसओ बिल्डिंग, सहावा मजला, डिएफ ब्लॉक, साल्ट लेक, कोलकत्ता येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

Maharashtra News Live Update: ठाण्यात जुन्या चाळीचा पहिला मजला कोसळला; महिला आणि दोन लहान मुले जखमी

Rajpal Yadav: राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जाणार; चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा मोठा दणका

पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

SCROLL FOR NEXT