Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

ECIL Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पेोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.बी.ई किंवा बीटेक केलेल्या तरुणांसाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.सरकारी कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कंपनीत टेक्निकल ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्हाला www.ecil.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ३० निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना सुरुवातीला २५००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी २८००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर कामाचा अनुभव आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई किंवा बीटेक केलेले असावी. याचसोबत ECE/ETC/E&I/इलेक्ट्रॉनिक्स/EEE/इलेक्ट्रिक/सीएई/आईटी/मैकेनिकलमध्ये डिग्री पाप्त केलेली असावी. याचसोबत त्यांनी एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप केलेली असावी.

अर्ज कसा करावा?

तुम्ही सर्वात आधी www.ecil.co.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर जॉब ओपनिंग या सेक्शनवर जावे.

यानंतर तुम्हाला आपली माहिती भरायची आहे. यानंतर सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.

रजिस्ट्रेशन शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. यानंतर प्रिंट आउट काढून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT