ECGC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ECGC Recruitment: पदवीधर तरुणांना ECGC मध्ये ऑफिसर होण्याची संधी; पगार १,२०,००० रुपये; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

ज्या तरुणांचे नुकतेच ग्रॅज्युएशन झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ECGC मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर पदावर काम करण्याची ही चांगली संधी आहे.

ईसीजीसीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी दर महिन्याला १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. १ सप्टेंबर २०२४ च्या आधारावर ही वयोमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये फी भरायची आहे. (ECGC Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी तुमची MCQ परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ४० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (ECGC PO Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devra Movie: 'देवरा पार्ट १' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घसरगुंडी; तिसऱ्या दिवशी केली इतक्याच कोटींची कमाई

Kheer Recipe : देवीसाठी नैवेद्यात बनवा ओल्या नारळाची खिर; चव चाखताच संपूर्ण टोप फस्त कराल

SA vs IRE: अफगाणिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेला आयर्लंडचा दणका! मिळवला ऐतिहासिक विजय

Job At Google: गूगलमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी; मिळणार लाखोंचे वेतन; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : बेशिस्त पुणेकरांवर महापालिकेची कारवाई, ३ कोटींचा दंड केला वसूल

SCROLL FOR NEXT