DRDO Recruitment Saam Tv
naukri-job-news

DRDO Recruitment :पदवीधर उमेदवारांना DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

DRDO Recruitment 2024: पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. DRDO मध्ये अप्रेटिंस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO)मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. डीआरडीओमध्ये भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही drdo.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

डिआरडीओमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या भरतीमध्ये ५४ पदे भरण्यात येणार आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ३० जागा रिक्त आहेत तर डिप्लोमा अप्रेटिंस पदासाठी २४ रिक्त जागा आहेत.या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात BE/B.Tech/BBA/B.com उत्तीर्ण असावे.ग्रॅज्युएट अप्रेटिंस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला ९ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. डिप्लोमा अप्रेटिंस पदासाठी उमेदवारांना ८ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी nats.education.gov.i वर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे चांगीपूर स्पीड पोस्ट येथे नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT