Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या सविस्तर

Government Job: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. १२ वी पास आणि पदवीधर तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत भरती केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

जिल्हाधिकारी कार्यलय परभणीगद्वारे ही भरती केली जाणार आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शिपाई पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी १०,००० रुपये मासिक मानधन मिळणार आहे. तर शिपाई पदासाठी ६,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ६ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. ५ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सध्या नोकरीच्या अनेक संधी आहेत. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. पश्चिम रेल्वेत मेडिकल प्रोफेशनल पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तर यावर्षी रेल्वेमध्ये जवळपास १०८८८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT