नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १००० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Central Bank of India Recruitment)
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील नोकरीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. सेंट्रल बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ६० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. (Central Bank Jobs)
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते ३० असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्ग आणि महिलांना १५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर सामान्य प्रवर्गातील नागरिकांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ४८४८० रुपये ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.