Central Bank Recruitmen Saam Tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: कोणतीही परीक्षा न देता मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी;७वी पास ते पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

Central Bank Of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमॅन आणि गार्डनर पदासाठी ही भरती करण्यात आली आहे. तुम्ही centralbankofinidia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. फॅकल्टी पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ५ जागा तर अटेंडरसाठी ३ जागा रिक्त आहेत.

पात्रता

फॅकल्टी पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराला कॉम्प्युटरची माहिती असायला हवी.उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे बीएसडब्ल्यू/बीए/ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी असायला हवी. उमेदवाराला एमएम ऑफिसचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तर वॉचमॅन आणि गार्डनर पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. फॅकल्ट पदासाठी ३०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आह तर ऑफिस असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये वेतन, अटेंडर पदासाठी १४,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

SCROLL FOR NEXT