Central Bank of India Saam Tv
naukri-job-news

Central Bank of India: ७वी पास तरुणांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी;अशा पद्धतीने करा अर्ज

Central Bank of India Recruitment: तरुणांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. नॅशनल बँकेत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँकेत फॅकल्टी आणि गार्डनर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीबाबत अधिसूचना पाहण्यासाठी centralbankofindia.co.in या वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट आहे. २३ ऑगस्टपूर्वी इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. याबाबत सर्व माहिती अधिसूचनेत देण्यात आलेली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रामीण विकासामध्ये एमएसडब्ल्यू/एमए/बीएससी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे.

गार्ड कम गार्डनर पदासाठी उमेदवार ७ वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराने शेतीत काम केलेले असावे. त्यांना मातीचे किंवा जमिनीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ पेक्षा जास्त नसावे. तर गार्डनर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ४० वयोगटातील असावे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांना ६००० ते २०,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Kidney Trafficking : चंद्रपूर किडनी प्रकरणात दुसर्‍या आरोपीला अटक; चीन कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT