Central Bank of India Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत असिस्टंट ते वॉचमन अशा अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. सेंट्रल बँकेसारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत (Central Bank of India) फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर/सब-स्टाफ आणि वॉचमन कम गार्डनर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in यावर जाऊन अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.फॅकल्टी पदासाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफिस असिस्टंट पदासाठी २२ ते ४० वयोगटातील तर अटेंडर, सब स्टाफ पदासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (Central Bank Of India Recruitment 2025)

सेंट्रल बँकेतील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. फॅकल्टी पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी १२,००० रुपये तर अटेंडर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे. वॉचमन कम गार्डनर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याबाबत अंतिम निर्णय समिती घेणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरावा. हा अर्ज क्षेत्रीय प्रबंधक/अध्यक्ष, LAC सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पहिला मजला, पटेल चौक, HPO जवळ, सीवान, पिन कोड- ८४११२२६ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT