Central Bank of India Saam Tv
naukri-job-news

Central Bank Recruitment: फ्रेशर्स आहात? सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; ४५०० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ४५०० अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Central Bank Of India Recruitment)

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील अप्रेंटिस पदासाठीची ही भरती ४५०० जागांसाठी होणार आहे. तुमच्याकडे नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

अर्ज कसा करावा? (How To Apply)

सर्वात आधी तुम्ही nats.education.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे स्वतः ला रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करावे. यानंतर तुमची सर्व माहिती भरावी. यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करावा. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या अप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिन्याचा असणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT