BIS Recruitment Saam Tv
naukri-job-news

BIS Recruitment: सरकारी नोकरी आणि महिना १,४२,००० रुपये पगार; कुठे निघाली भरती? जाणून घ्या पात्रता आणि अटी

Breau Of Indian Stanadard Recruitment: भारतीय मानक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ए, बी आणि सी पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या देशभरातली ऑफिसमध्ये ही भरती होणार आहे. ग्रुप सी/बी आणि ए पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

भारतीय मानक विभागात सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी १२८ जागा रिक्त आहेत. यामध्ये ग्रुप सीमधील पदांसाठी दर महिन्याला २५,५०० ते ८१,००० रुपये पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा २७ वर्ष आहे. (BIS Jobs)

सिनियर सेक्रिटरिएट असिस्टंटसाठी १२८ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांकडे पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांना कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट द्याव्या लागतील. यामध्ये वर्ड प्रोसेसिंग टेस्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेड शीट टेस्ट आणि मायक्रोसॉफ्य पॉवर पॉइंट टेस्ट घेण्यात येणार आहे.

स्टेनोग्राफरसाठी १९ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांकडे पदवी असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना टायपिंग, शॉर्ट हँड टेस्ट द्यावी लागणार आहे. सिनियर टेक्निशियनमध्ये कारपेंटरसाठी ७ पदे रिक्त आहेत. वेल्डरसाठी १ पदे आहे. प्लंबरसाठी २ पदे रिक्त आहेत.फिटर पदासाठी ५ पदे रिक्त आहेत. या पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.तसेच ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी ७८ जागा रिक्त आहेत.यासाठी पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. (Breau Of Indian Standard Recruitment)

ग्रुप बीमधील पदांसाठी ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे. यामध्ये पर्सोनल असिस्टंटसाठी ४३ पदे रिक्त आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी ४३ पदे रिक्त आहेत.असिस्टंटसाठी १ पद रिक्त आहे. टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरीसाठी २७ पदे रिक्त आहेत. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT