BMC Jobs Saam Tv
naukri-job-news

BMC Jobs: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळणार ९२००० पगाराची नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा?

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कारनिर्धारण व संकलन खात्यात नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत निरीक्षक गट क म्हणजेच ग्रुप सी इन्स्पेक्टर पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १७८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २९,००० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे.(BMC Job)

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठीही भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात जवळपास दोन महिन्यांपूर्वी देण्यात आली होती. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवार ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. १०वी पास आणि पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (BMC Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Road Accident : भरधाव कार रस्त्यावर उभ्या डंपरला धडकली; पती-पत्नीसहित ४ जणांचा मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Dasra Melava : नारायण गडावर जरांगेंचा आवाज घुमणार; दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

BJP Mission OBC: महाराष्ट्रात भाजपचं सोशल इंजिनिअरिंग, ओबीसीत 15 नव्या जातींचा समावेश; BJP ला निवडणुकीत होणार फायदा? वाचा...

VIDEO : 'रत्न' हरपला; रतन टाटा यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Maharashtra News Live Updates: नाशिकला परतीच्या पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT