Airport Vacancy 2024 Saam Tv
naukri-job-news

Airport Vacancy 2024: दहावी- बारावी पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; एअरपोर्टवर ३५०० हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या

Bhartiya Aviation Service Recruitment 2024: दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय विमानतळावर ३५०० हून अधिक जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

दहावी, बारावी शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय विमानतळावर मोठी भरती सुरु आहे. जवळपास ३५०० जागांसाठी भरती आहे. यासाठी दहाव, बारावी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या भरतीची अधिसूचना भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेसने प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला चांगला पगारदेखील देण्यात येणार आहे.

भारतीय एव्हिएशन सर्व्हिसमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२४ आहे. त्यामुळे त्याआधीच अर्ज करा.

या भरतीसाठी एकूण ३५०८ पदे रिक्त आहेत. त्यातील २६५३ रिक्त पदे ही ग्राहक सेवा एजंट आणि ८५५ पदे हाउसकिपिंगसाठी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रात दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. याासाठी वयाची अटदेखील आहे. जर तुम्ही ग्राहक सेवा एजंटसाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय १८ ते २८ वर्ष असावे. याचसोबत तुम्ही हाउसकिपिंगसाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय कमाल ३३ वर्ष असावे. १२ चा अभ्यास करत असलेले लोकदेखील या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

या भरतीमध्ये ग्राहक सेवा एजंट (CSA) पदासाठी १३ हजार ते ३० हजार रुपयांचे मासिक वेतन देण्यात येणार आहे. तर हाउसकिपिंग पदासाठी १२ हजार ते २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. या पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना १ सप्टेंबर २०२४ पूर्वी हावी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT