Bharat Petroleum Job Saam Tv
naukri-job-news

Bharat Petroleum Job: 'बीपीसीएल'मध्ये नोकर भरती; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी, पात्रता काय? पगार किती? जाणून घ्या

Siddhi Hande

शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत पेट्रोलियममध्ये सध्या भरती सुरु आहे. ज्या तरुणांचे शिक्षण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप भरती जाहीर करण्याच आली आहे.

मुंबई रिफायनरी ही भारत सरकारचा उपक्रम आहे. च्याअंतर्गत इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसची पदे भरती केली जाणार आहे. एकूण ९६ पदे भरण्यात येणार आहे.

केमिकल इंजिनियरिंग पदासाठी २२ पदे रिक्त आहेत. सिव्हील इंजिनियरिंगसाठी १० पदे रिक्त आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स पदासाठी ४ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग १३ पदे आहेत.इन्स्ट्रुमेंटेंशन/इइलेक्ट्रॉनिक्ससाठी ९ पदे आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंग ३० पदे आहेत. फायर अँड सेफ्टी पदासाठी ८ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी उमेदवाराने संबंधित विषयातील फर्स्ट इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली आहे. पात्रता परीक्षा २०२०,२०२१,२०२२,२०२३ आणि २०२४ मध्ये दिलेली असावी.

कॅटेगरी २ डिसिप्लिननुसार टेक्निशियन डिप्लोमा/ नॉन- इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स अप्रेंटिससाठी ७९ पदे रिक्त आहेत. केमिकल इंजिनियरिंग पदासाठी १६ जागा रिक्त आहेत. सिव्हील इंजिनियरिंग पदासाठी १२ जागा रिक्त आहेत.इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदासाठी १२ जागा तर इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी १० जागा रिक्त आहेत.B.Com नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट,बी एस सी, बीबीए या पदासाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी उमेदवाराने संबंधित विषयातील इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी.

१८ ते २७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी २५,००० रुपये स्टायपेंड देण्यात येईल. नॉन- इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स अप्रेंटिससाठी १८००० रुपये पगार दिला जाईल. या ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

यासाठी तुम्ही www.nats.eduaction.gov.in या वेबसाइटवर स्वतः ला स्टुडंट रजिस्टरमध्ये लॉग इन करुन घ्या. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Effect On Health: आहारात मीठाचं सेवन जास्त प्रमाणात करताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Indian Port Workers Salary : बंदर आणि गोदी कामगारांना घसघशीत पगारवाढ; पगार किती टक्क्यांनी वाढणार? वाचा

Bribe Case : शाळेतील शिपायाकडून १० हजाराची मागणी; मुख्याध्यापक एसीबीच्या ताब्यात

Hasan Mushrif : 'मी पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण ..' ; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

IPL 2025: राजस्थान रॉयल्स संघ या ४ खेळाडूंना करू शकतो रिटेन

SCROLL FOR NEXT