BEL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BEL Recruitment: फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १.४० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

BEL Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नवरत्न कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये डेप्युटी इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्समधील या नोकरीसाठी तुम्हाला bel-india.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एकूण ३५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ मार्च २२६ रोजी सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचएआरए, मेडिकल सुविधादेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही भरती ५ वर्षांसाठी होणार आहे. पुढे २ वर्षांसाठी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/ बीएससी केलेले असावे. सिविल इंजिनियरिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चपमध्ये एमएससी केलेले असावे. या नोकरीसाठी फ्रेशर्स अर्ज करु शकतात. कोणत्याही अनुभवाची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

जगावर पुन्हा मोठं संकट कोसळणार; महायुद्धाचा भडका उडणार, वैश्विक राजकारणात नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी! पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री अन् पानटपऱ्या बंद

SCROLL FOR NEXT