Bank Of Maharashtra Saam TV
naukri-job-news

Bank Of Maharashtra Bharti: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये या पदांसाठी सुरु आहे भरती; मिळणार भरघोस पगार; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Bank Of Maharashtra Recruitment 2024 Last Date To Apply: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. बँकेच्या विविध विभागातील पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्यातील सर्वात चांगली बँक आहे. बँकेत स्केल I,II,III,IV,V आणि VI मधील कर्मचाऱ्यांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

बँकिग क्षेत्रात काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा ५० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

आयटी डिपार्टमेंट, बँकिंग डिपार्टमेंट, सीआयएसओ, सीडीओ, फॉरोक्स अँड ट्रेझरी विभागात नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी एकूण १९५ पदांवर भरती होणार आहे. २६ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी पात्रता निकष आणि जन्मतारखेचा पुरावा दाखल करावा. यासंबंधित कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी घेऊन जाणे गरजेचे आहे.

याचसोबत आयबीपीएसद्वारे विविध बँकामध्ये पदभरती केली जाणार आहे. आयबीपीएसद्वारे क्लर्क या पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT