BOI Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५९ रिक्त पदे; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bank Of India Recruitment 2025: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियामध्ये सध्या ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही bankofinfia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ८ मार्च २०२५ पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२५ आहे. या भरतीमध्ये बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर पदे भरती केली जाणार आहे. एकूण १५९ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ इंडियामधील चीफ मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४५ वर्षे असावी. सीनियर मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४० वर्षे असावी. मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे असावी.

बँक ऑफ इंडियामधील मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.

बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट किंवा इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत होण्याचा पर्याय असेल. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT