Bank Job Saam TV
naukri-job-news

Bank Of India: ७वी ते १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; बँक ऑफ इंडियामध्ये भरती ; अर्ज कसा करावा?

Bank Of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वॉचमन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असतात. जर तुम्हालाही सरकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसरमार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे. (Bank Of India Recruitment)

बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन पदासाठी भरती सुरु आहे. ७वी ते १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. याबाबत जाहिरात बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे.

बँकेत वॉचमन पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Bank Of India Recruitment)

रत्नागिरी येथील कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा. या नोकरीसाठी भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहेतय

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी १३ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी, लाललुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ येथे पाठवायचा आहे.

SBI भरती

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. कस्टमर सपोर्ट अँड सेल्स विभागात तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT